Wednesday , March 4 2026
Breaking News

….म्हणे महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना हद्दपार करा : करवेची हास्यास्पद मागणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथे कर्नाटक राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करून अधिवेशनाला विरोध करतात, हा निर्णय घेणाऱ्या समिती नेत्यांना बेळगाव मधून हद्दपार करण्याची हास्यास्पद मागणी करवे म्होरक्याने केली आहे.

बेळगाव जिल्हा करवे अध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी म्हटले आहे की, बेळगाव येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र एकीकरण समितीवर तात्काळ बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा, म्हणे समिती बेळगावात भाषिक तेढ निर्माण करून शत्रुत्वाचे विषारी बीज पेरण्याचे काम करत आहे. बेळगाव येथे वारंवार राज्यद्रोही कारवाया करून बेळगावातील शांतता भंग करत सल्याचा आरोपही या म्होरक्याने केला.

सरकार बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यासाठी समितीला परवानगी देत ​​असते. सरकारची ही राज्यविरोधी वृत्ती थांबवावी. महाराष्ट्र एकीकरण समितीवर कायमची बंदी घालून आणि कन्नडीगांचे हित जपले जावे, अशी मागणी करवे कार्यकर्त्यांनी यावेळी गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्याकडे केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *