Tuesday , March 3 2026
Breaking News

शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले . डॉ.विनोद व्हनाळकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सामूहिकरित्या भारतीय संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आले. संविधानात नमूद केलेल्या समानता, स्वातंत्र्य, न्याय या पालन करण्याची शपथ घेण्यात आली. संविधान संरक्षणासाठी उपस्थित सदस्यांनी शपथ घेतली. कार्यक्रम संयोजनासाठी संस्थेमधील कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *