
येळ्ळूर : नुकतीच श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळ व कार्यकारिणीची बैठक बुधवार (ता. 26) रोजी रात्री 8:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीमध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम ठरविण्यात आले.
मंगळवार (ता. 9 ) डिसेंबर 2025 रोजी येळ्ळूर मध्ये मारग मळणे कार्यक्रम होईल. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी येळ्ळूरचे भाविक सौंदत्ती यल्लामा यात्रेसाठी जानेवारी महिन्यात जाणार आहेत. शनिवार (ता. 3) जानेवारी 2026 रोजी येळ्ळूरच्या भाविकांच्या वतीने सौंदत्ती यल्लामा डोंगरावर पडल्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मंगळवार (ता. 6) जानेवारी 2026 रोजी येळ्ळूर वेशीतील थडे देव मंदिर परिसरात मळ्यातील यात्रोत्सव होणार आहे. याची गावकऱ्यांनी नोंद घ्यावी असे श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta