
बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर स्कुलचा वार्षिक क्रीडामहोत्सव आरपीडी कॉलेजच्या क्रीडांगणावर उत्साहात प्रारंभ झाला. या वेळी प्रमुख पाहुणे माननीय श्री. विश्वास पवार सर, प्राचार्या शोभा कुलकर्णी, अनिल गोरे, के ऐे हागीदळे, श्री. विश्वास गावडे सर, श्री. शंकर गावडे सर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवर मंडळींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना देण्यात आले. सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इत्यादी संघानी पथसंचलन सादर केले. व पाहुण्यांना मानवंदना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. सर्व राष्ट्रीय व मीनी ऑलिंपीक खेळाडुंच्या हस्ते मैदाना भोवती क्रीडा ज्योत फिरवुन पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात केले व उदघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात 700 विदयार्थ्यानी भाग घेतला. या पथसंचलनामध्ये शिवाजी हाउसने उत्कृष्ट व प्रथम क्रमांक मिळवला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी खेळाचे महत्व सांगीतले. खेळ खेळाडू वृत्तीने खेळ करावा. यामुळे शिक्षणाच्या दृष्टिने खेळाचा कसा उपयोग होतो. तसेच सर्व राष्ट्रीय खेळ व पदक विषयी इत्यादी माहीती सांगितले.
पथसंचलनाचे नेतृत्व कुमारी इरा बंग व सर्व स्कुल हाऊसनी विद्यार्थ्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या पाहुण्यांची ओळख कुमारी नव्या रेवणकर यानी केले. स्वागत पर भाषण कुमारी प्रार्थना कुलकर्णी, सुत्रसंचालन सौ. सोनल भातकांडे मॅडम व मीनाक्षी सुतार मॅडम यानी केले. आभार प्रदर्शन कुमारी अनन्या रायकर यानी केले.
Belgaum Varta Belgaum Varta