Tuesday , June 25 2024
Breaking News

“बेळगाव श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने, संजय सुंठकर एस. एस. एस. स्पोर्ट्स फौंडेशन कणबर्गी पुरस्कृत 56 व्या जिल्हास्तरीय बेळगाव श्री 2022 शरीरसौष्ठव स्पर्धेला मराठा मंदिराच्या सभागृहात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा, संजय सुंठकर, बाळासाहेब काकतकर, नीना काकतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सरचिटणीस चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, खजिनदार दिनकर घोरपडे, आयोजन समिती सचिव अजित  सिद्दन्नावर, रणजीत मनोळकर, संजय मोरे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, जे निळकंठ, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना अध्यक्ष एम. के. गुरव, विकास कलघटगी, नारायण चौगुले, शिवाजी हंडे, बापू जाधव, अविनाश पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. बेळगाव जिल्हा युवजन सेवा आणि क्रीडा खात्याचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, बाळासाहेब काकतकर, डॉ.नम्रता मारुती देवगेकर, कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना अध्यक्ष जे.नीळकंठ, उमा महेश, मिलिंद सालियन, चंद्रकांत गुंडकल, नेताजी जाधव, बापू जाधव, विकास कलघटगी, महादेव चौगुले, अजित सिद्दन्नावर, यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

भाजपा उत्तर विभागाच्यावतीने लसीकरण मोहिम

Spread the love  बेळगाव : भारतीय जनता पक्ष उत्तर विभागाच्या वतीने बुथ पातळीवर डेंग्यू आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *