
बेळगाव – गोव्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दि. 13 व 14 डिसेंबर रोजी म्हापसा येथे आयोजित 21 व्या शेकोटी साहित्य संमेलनात बेळगावचे पत्रकार व कवी सहभागी होणार आहेत.
म्हापसा येथील प्रसिद्ध बोडगेश्वर मंदिराच्या आवारात होणा-या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गोवा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विनय मडगावकर असतील तर उद्घाटन नामवंत गोमंतकीय कवयित्री कविता बोरकर करणार आहेत. प्रमुख अतिथी या नात्याने कागवाडच्या शिवानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक अलगोडी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील व गोव्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसात नऊ सत्रात चालणाऱ्या या संमेलनात निमंत्रिताच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद बेळगावचे ज्येष्ठ कवी बसवंत शहापूरकर भूषविणार असून महाराष्ट्र व गोव्यातील कविसोबत बेळगावचे कवी सुधाकर गावडे व नितीन आनंदाचे यांचा सहभाग असणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta