
बेळगाव : फुलबाग गल्ली येथे गटारीचे काम सुरू असताना तेथील रहिवाशांच्या ड्रेनेज टाईप खराब झाल्या आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही ही बाब स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी ड्रेनेज पाईप दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते परंतु चार दिवस उलटले तरी देखील महानगरपालिकेने याची दखल घेतलेली नाही. स्थानिक नगरसेवकांना वारंवार फोन करून विनंती करून देखील महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होत आहे त्याचप्रमाणे फुलबाग गल्ली येथे रस्ता, गटार आणि पाण्याची पाईपलाईन देखील खराब झाली आहे. रस्ता निर्मितीसाठी उत्तर मतदारसंघाच्या आमदारानी भूमिपूजन केले होते त्यानंतर ते या भागाकडे फिरकलेले नाहीत. फुलबाग गल्ली येथील रस्ते, गटार आणि पाण्याची पाईपलाईन पूर्णपणे खराब झाले आहेत. रेल्वे गेट देखील कायमस्वरूपी बंद आहे त्यामुळे व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित खात्याने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी फुलबाग गल्ली येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta