Tuesday , December 16 2025
Breaking News

समाज सारथी सेवा संघाची येळ्ळूरमध्ये स्थापना

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर मधील समान विचार आणि ध्येय असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक किंवा सामुदायिक समस्या सोडवण्यासाठी तसेच कल्याणकारी कार्य करण्यासाठी एक संघटित शक्ती निर्माण करण्याचा उद्देश ठेवून गावामध्ये समाज सारथी सेवा संघाची स्थापना केली आहे. संघटनेच्या माध्यमातून सामूहिक ध्येय साध्य करणे, समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे व सामाजिक बदल घडवून आणणे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
गावातील समविचारी कार्यकर्त्यांची बैठक नेताजी मराठी सांस्कृतिक भवन मध्ये पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवाजी सायनेकर हे होते. प्रारंभी उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत व संघटनेच्या उपक्रमाविषयी माहिती प्रा. सी एम गोरल यांनी दिली. प्रस्ताविक बी एन मजूकर यांनी केले. संघटना स्थापनेचा उद्देश अनिल हुंदरे, दुधाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, गोविंद कालसेकर, राजू पावले यांनी स्पष्ट केला. संघटनेच्या माध्यमातून कोण कोणते उपक्रम आम्ही वर्षभर राबवू शकतो यावर अभियंते हणमंत कुगजी, डॉ. तानाजी पावले, डी जी पाटील, गंगाधर पाटील, प्रकाश पाटील, परशराम धामणेकर यांनी विवेचन केले. यावेळी मनोहर गोरल, सतीश पाटील, रमेश धामणेकर, बळीराम देसुरकर, परशराम बिजगरकर, संजय गोरल, यल्लुप्पा पाटील, सतीश देसुरकर, सुरज गोरल, हणमंत पाटील, कृष्णा टक्केकर, सुभाष मजुकर, परशराम निंगाप्पा धामणेकर, संजय मजूकर, परशराम कणबरकर, मोहन पाटील, कृष्णा बिजगरकर, रघुनाथ मुरकुटे, बबन कानशिडे आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी राजू पावले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक बालविकास अकादमीचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात

Spread the love  बेळगाव : “मुलांवर कोणताही अनावश्यक दबाव न टाकता त्यांच्या आवडीच्या निवडीला पालकांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *