

बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघ व गावकरी आयोजित 20 वे साहित्य संमेलन रविवार दि. 28 रोजी आयोजित केले आहे.
संमेलन शामियाना मुहुर्तमेढ रोपण कार्यक्रम शनिवार दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता कुद्रेमानी हायस्कूलच्या क्रीडांगणात आयोजित केला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरपासून भजनाच्या साथीने मुहुर्तमेढची मिरवणूक काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन जांबोटकर राहणार असून सीताराम सुतार व मनीषा सुतार यांच्याहस्ते मुहुर्तमेढ रोपण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अजित सावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती साहित्य संघाचे अध्यक्ष उमेश गुरव यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta