
बेळगाव : सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमा प्रश्नी ठराव घेण्याचे ठोस आश्वासन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठवलेल्या पत्रात जोशी यांनी आश्वासन दिले आहे या अगोदर बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र घेण्याची विनंती केली होती.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पत्राची दखल घेत, आगामी सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्न” संदर्भातील ठराव निश्चितपणे मांडला जाईल, अशी खात्री देखील संमेलन महामंडळाने दिली आहे. 69 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रकरणासंबंधी महाराष्ट्र शासनाकडे मागणी म्हणून आणि न्यायालयीन प्रक्रियेस अनुकूल ठरेल असे अपेक्षित आहे. * संमेलन महामंडळाने स्पष्ट केले की, मराठी भाषिकांची हक्कांची व मातृभाषेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि मराठी भाषिकांची मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन हा ठराव ठोसपणे घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
साहित्य संमेलन महामंडळाने स्पष्ट केले आहे की मराठी भाषिकांची हक्कांची व मातृभाषेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, तसेच मराठी भाषिकांची मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन, हा ठराव ठोसपणे घेण्यात येईल, असे आश्वासन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला देण्यात आले आहे.
सारांशतः, आगामी साहित्य संमेलनात मराठी भाषिकांच्या हितासाठी कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रकरणावर ठराव निश्चित केला जाईल, असे समितीने सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta