
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि प्रशिक्षक म्हणून ‘हार्टफुलनेस मेडीटेशन सेंटरचे’ प्रशिक्षिक ब्रदर सतिश लाभले होते. तर व्यासपीठावर कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर आणि उप-प्राचार्य डॉ. नागेश उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी शिंपून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
नंतर ब्रदर सतिश यांनी .. ध्यान धारणेचे महत्व आणि त्याची पद्धत याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं.
यावेळी ध्यानाचे महत्त्व, ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानाची भूमिका तसेच दैनंदिन जीवनात ध्यानाचा उपयोग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी अर्धातास सामूहिक ध्यानाचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. यात प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाच्या शेवटी ध्यानामुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांवर चर्चा करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या निमित्ताने ध्यान दिनाचे औचित्य साधून आरोग्यप्रद जीवनशैलीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्फूर्ती मलकी यांनी केलं. पाहुण्यांची ओळख कु. सोनाली शेंडे यांनी करून दिली तर कु. कुणाल सोलंकुरे यांनी आभार मानले..
Belgaum Varta Belgaum Varta