Tuesday , December 23 2025
Breaking News

प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर उद्या बेळगावात: कार्यक्रम सर्वांना खुला

Spread the love

 

बेळगाव : येथील प्रतिष्ठित शिक्षण संस्था ‘बेळगाव एज्युकेशन सोसायटी’ च्या बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर उपस्थित राहणार आहेत. शाळेच्या भव्य मैदानावर हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात सचिन पिळगावकर विद्यार्थ्यांशी आणि उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. विशेषतः चित्रपट दिग्दर्शन, सिनेसृष्टीतील करिअरच्या विविध संधी आणि मराठी चित्रपटसृष्टीची गेल्या काही वर्षांतील लक्षणीय प्रगती या विषयांवर ते आपले विचार मांडतील. अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि संगीताचा दांडगा अनुभव असणारे सचिनजी तरुण पिढीला या क्षेत्रातील तांत्रिक आणि सर्जनशील पैलूंबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

बी.के. मॉडेल हायस्कूलला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित या सात दिवसीय महोत्सवात अनेक नामवंत व्यक्ती हजेरी लावत आहेत. सचिन पिळगावकर यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील नव्या क्षितिजांची माहिती मिळेल, असा विश्वास शाळेच्या व्यवस्थापन समितीने व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला बेळगावमधील कलाप्रेमी आणि माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन अविनाश पोतदार आणि सहकारी यांनी केले आहे.

अल्पपरिचय
सचिन पिळगावकर यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला असून अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे.
नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, एकापेक्षा एक, नवरा माझा नवसाचा व कट्यार काळजात घुसली हे त्यांचे मराठीतील गाजलेले चित्रपट होत तर गीत गाता चल, अखियों के झरोखोसे, नदिया के पार, शोले आणि सत्ते पे सत्ता या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली.
त्यांना अनेक पुरस्कारानी गौरविण्यात आले असून अष्टविनायक व कट्यार काळजात घुसली साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे याबरोबरच काही चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खासदार धैर्यशील माने यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : करवे

Spread the love  बेळगाव (वार्ता) : गेल्या पन्नास वर्षांपासून महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊन चिथावणीखोर भाषणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *