Tuesday , December 30 2025
Breaking News

अवैध दारू विक्री विरोधात अबकारी विभागाच्या धडक मोहीमेत २.२८ कोटींचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव व चिक्कोडी विभागात अवैध दारू विक्री आणि बेकायदा पार्ट्यांविरोधात अबकारी विभागाने गेल्या नऊ महिन्यांत व्यापक मोहीम राबवली असून या कारवाईत १२९४ गुन्हे दाखल करून सुमारे २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अबकारी सहआयुक्त फकीरप्पा चलवादी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत ग्रामीण भागातील ७८३ अवैध दारू विक्री प्रकरणांचा समावेश आहे. हातभट्टी दारू तसेच ढाब्यांवरील बेकायदा पार्ट्या रोखण्यासाठी बीट पातळीवर विशेष पथके तैनात करण्यात आली असून, नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

रायबाग येथील एका बारमध्ये पाच वर्षांच्या मुलाला दारू पाजल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, संबंधित बारवर गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू असल्याचे चलवादी यांनी सांगितले. अबकारी विभागात सुमारे ३० टक्के मनुष्यबळाची कमतरता असली, तरी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या मदतीने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मद्य विक्रेत्यांना कोणतेही विक्री लक्ष्य देण्यात आलेले नसून, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच नवीन वर्षाच्या नावाखाली होणारे अवैध प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला अबकारी जिल्हाधिकारी जगदीश एन. के., निंगनगौडा पाटील, विजय हिरेमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘महाराष्ट्र भवना’ला विरोध करण्यासाठी करवेचा थयथयाट

Spread the love  बेळगाव : बेळगावमध्ये सीमावर्ती मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *