Tuesday , March 3 2026
Breaking News

श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याला उद्या गुरुवारपासून मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ होत आहे.
माघ शुद्ध एकादशी गुरुवार दि. 29 जानेवारी ते माघ शुद्ध चतुर्दशी रविवार दि. 1 फेब्रुवारी पर्यंत असा हा चार दिवसांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या गुरुवार उत्सवाचा पहिला दिवस असून सकाळी 6 ते 7 वा. चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 12 वा. कुंकूमार्चन, सकाळी 11 वाजता श्री देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका सौ. शालिनी अनिल चौगुले उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 3 वा प.पु. श्री कलावती माता यांचे भजन. दुपारी 3 ते 4 वा. विवेकानंद भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 4 ते 5 वा. दीपा तबला वादन यांच्याकडून भक्ती संगीत. संध्या. 5 ते 6 वा. सौ.यमनक्का भजनी मंडळाचे भजन. संध्या. 6 ते 7 वा. श्री गजानन भजनी मंडळ यांचे भजन. संध्या 7 ते 9 वा. कीर्तनकार समर्थ सौ. दिपाली देशपांडे यांचे कीर्तन. असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *