बेळगाव : विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे, असे मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केले आहे.
हुक्केरी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. बेळगाव जिल्हा अठरा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांमध्ये गणला जात असून जिल्ह्याचा विकास खास गुंतला आहे. चिकोडी, बैलहोंगल आणि बेळगाव अशा तीन विभागात सध्या कामकाज सुरू असून प्रशासकीय प्रगतीच्या दृष्टीकोनातून बेळगाव जिल्ह्याचे तीन भागात विभाजन करणे आवश्यक आहे. सदर प्रस्ताव राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे उमेश कत्ती म्हणाले.
राज्यातील मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याची प्रगती विविध कारणास्तव खुंटली आहे. विकास कामात अनेक समस्या उद्भवत आहेत. यामुळे आगामी काळात बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक असल्याचे मत उमेश कत्ती यांनी व्यक्त केले.
