बेळगाव : शहापूर मुक्तिधाम या ठिकाणी नागरिकांच्या उपयोगासाठी निर्माण झालेली आवश्यकता ओळखून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकार उपेंद्र बाजीकर यांच्या नेतृत्वाखाली बि. के. मॉडेल मित्र परिवाराने आर्थिक मदत देऊ केली. तसेच सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पासाठी खारीचा वाटा उचलला आहे. शहापूर मुक्तीधामचे पदाधिकारी ईश्वर जोरापुर, श्रीकांत काकतीकर, हिरालाल चव्हाण यांच्याकडे या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्रीकांत काकतीकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करून परिवाराचे धन्यवाद मानले. उपेंद्र बाजीकर यांनी यावेळी हा आपला खारीचा वाटा असल्याचे सांगितले. यावेळी सर्वश्री सुधीर मेलगे, नितीन हुलबत्ते, विनायक पाटील, श्रीकांत हुंदळेकर, महेश भिसे, गजानन गोवेकर, दिनेश शिरोळकर आदी उपस्थित होते. तसेच मित्र परिवारातील सदस्य भरत पोरवाल आणि क्षितिज बेळंकी यांनी देखील यात योगदान दिले.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …