Wednesday , June 19 2024
Breaking News

तोक्ते तक्रीवादळाचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यालाही फटका

Spread the love

सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वीत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भागाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. गुजरातच्या दिशेनं निघालेलं असणआरं अरबी समुद्रातील हे वादळ वाटेत आलेल्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान करुन गेलं. ज्याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. अनेक घरं, मोठे वृक्ष आणि रस्त्यांची यामध्ये नासधूस झाली. त्यातच इतिहासाच्या पाऊलखुणा असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही या वादळाचा फटका बसला.

चक्रीवादळानंतर तातडीने राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि सत्तेतील काही मंडळींनी थेट कोकण गाठत वादळग्रस्त भागाची पाहणी केली, मदतीची आश्वासनंही दिली. पण, महाराजांच्या पराक्रमी गाथांमधील महत्त्वाचा साक्षीदार असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे मात्र वादळानंतर आता 12 दिवस उजाडला असतानाही कोणाचंच लक्ष गेलेलं नाही.

तोक्ते चक्रीवादळामुळे शिवप्रभूंची शिवलंका म्हणून नावाजलेल्या मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्यावरील घरांची, वीज खांबांची झालेली पडझड, मोडून पडलेली झाडे आणि गेले अकरा दिवस विजेअभावी जीवन जगणाऱ्या सिंधुदुर्ग किल्लेवासी असंच चित्र या भागात पाहायला मिळत आहे. आज बारावा दिवस उलटूनही अद्यापही प्रशासन इथं पोहोचलेलं नाही ही शोकांतिका.

तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचंही नुकसान झालं आहे. महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधले असून, या मंदिराच्या मागील बाजूस झाड पडल्याने मंदिराच्या छताचे नुकसान झाले आहे. तर किल्ले सिंधुदुर्ग वरील श्री देवी भवानी मंदिर आणि महापुरुष मंदिराच्या छपराची कौलेही उडून गेली आहेत. किल्ला आणि समुद्रातील वीज खाबांची पडझड झाल्यामुळे किल्यावर अंधाराचं साम्राज्य आहे. त्यामुळं आता हा संपूर्ण किल्ला आणि किल्ल्यावर राहणआरे रहिवासी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला नवा अल्टीमेटम

Spread the love  शंभूराजे देसाईंची शिष्टाई फळाला जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगें …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *