Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

बरगाव येथील मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या त्रिकुटापैकी एक ताब्यात

  खानापूर : रात्रीच्या सुमारास मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या त्रिकुटापैकी एक चोरटा हाती लागला. प्रज्वल प्रकाश वागळेकर (वय 21) रा. बरगाव, तालुका खानापूर असे हाती लागलेल्या संशयीत चोरट्याचे नाव असून हातातून निसटलेली जोडगोळीही बरगावचीच असल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी रोडवरील बरगाव जवळ असलेल्या के. पी. पाटील नगरातील साई मंदिरातील दानपेटी …

Read More »

मणतुर्गा येथे भरदिवसा घरफोडी; 5 लाखाचा ऐवज लंपास

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथे बुधवारी दुपारी दरम्यान घराचा पाठीमागील दरवाजा तोडून तिजोरीतील सोने, चांदीच्या ऐवजासह रोख रक्कम मिळून 5 लाखाचा चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत मिळालेली माहिती की, मणतुर्गा येथील अल्बेट मोनु सोज हे घरचा दरवाजा बंद करून शेतवडीकडे कामासाठी गेले होते. त्यांचे घर असोगा रोडवरील गावच्या वेशीत …

Read More »

मानजवळच्या धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मान जवळील शिंबोली धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. तर अन्य एक जण थोडक्यात बचावला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिरनवाडी व हुंचेनहट्टी येथील काही युवक चोर्लां जवळील मान येथील शिंबोली या …

Read More »

खानापूरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गुंडुपी गावातील सबा मुजावर नामक महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिची आई बसेरा साहेबखान यांनी नंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सबा मुजावर हिला तिचा पती मुजाहिद्दीन मुजावर, सासरा शब्बीर मुजावर, सासू दिलाशाद मुजावर यांनी नीट स्वयंपाक येत नाही म्हणून त्रास देत होते. …

Read More »

वडिलांच्या वाढदिनी केला नव्या व्यवसायाचा शुभारंभ

  खानापूर : बेरोजगारी वाढली आहे, ही ओरड नेहमीचीच झाली आहे, पण तरूणांनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय थाटावा आणि त्यातून समाजसेवा करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पत्रकार वासूदेव चौगुले यांनी केले. सावरगाळी येथील उदय नारायण कापोलकर यांच्या कापोलकर ट्रेडर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी …

Read More »

गणेबैल टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्यात शेतकऱ्यांना यश!

  खानापूर : गणेबैल टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली करण्यात येणार होती. त्या संदर्भात कालच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे व संपूर्ण रस्ता व सर्वीस रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करण्यात येऊ नये अन्यथा टोल नाका बंद पाडण्यात येईल असा इशारा दिला …

Read More »

गणेबैल टोल नाक्यावरील टोल वसुलीस सर्व थरातून विरोध

  खानापूर : खानापूर- बेळगाव महामार्गावर गणेबैल येथे उद्या मंगळवार दिनांक 11 जुलैपासून टोल वसुली करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. स्थानिक नेत्यांनी याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गणेबैल ते झाडशहापूर जवळपास 12 किलोमीटरचा रस्ता अजून पूर्णत्वास आलेला नाही. काही …

Read More »

खानापूर म. ए. समिती अध्यक्षपदी गोपाळ देसाई यांची पुन्हा वर्णी

  खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा तिढा अखेर आज सुटला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी निवडीसंदर्भात इडलहोंड येथे दि. 10 जुलै रोजी माजी आमदार दिगंबराव पाटील, माजी सभापती मारुतीराव परमेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मागील आठवड्यात झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वसाधारण …

Read More »

खानापूरचे मलप्रभा क्रीडांगण की गायरान? कधी होणार क्रीडागंणाचा कायापालट

  खानापूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सर्टीफायस्कूल जवळ उभारण्यात आलेल्या मलप्रभा क्रीडांगणाची दुरावस्था जशीच्या तशीच आहे. या मलप्रभा क्रीडांगणाचा कायापालट कधी होणार, अशी मागणी खानापूर शहरातील क्रीडा प्रेमीतून होताना दिसत आहे. माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या काळात मलप्रभा क्रीडांगणाची उभारणी झाली. त्यांच्या काळात …

Read More »

शेतकऱ्यांच्या जमिनीची रक्कम मिळाल्याशिवाय गणेबैल टोलनाका चालु करू देणार नाही : प्रमोद कोचेरी यांची भुमिका

  खानापूर : बेळगाव -गोवा राष्ट्रीय महामार्गात शेत जमीन गेलेल्या प्रभूनगर, निट्टूर, गणेबैल, हलकर्णी, हत्तरगुंजी, करंबळ, होनकल, माणिकवाडी, सावरगाळी, माडीगुंजी, लोंढा गावातील भूसंपादन केलेल्या जमिनीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. तसेच (अतिरिक्त भूसंपादन) ॲडिशनल जमिनीचे पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळवण्यासाठी शेतकरी १० वर्षापासून प्रांताधिकार्‍यांच्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारत आहेत. या शेतकऱ्यांकडे ना …

Read More »