Sunday , June 28 2026
Breaking News

ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी हिरव्या मक्यासह कडब्याच्या खरेदची लगबग

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात खरीप हंगामात अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. यामुळे मक्याच्या हिरव्या चाऱ्यासह ज्वारीचा कडबा खरेदी करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा हिरवा चारा उपलब्ध नसल्याने मक्यासह कडब्याचे दर वाढल्याने जनावरांसाठी चारा संकलन करताना शेतकऱ्याची कोंडी होत आहे. तर काही शेतकऱ्यांनी रिकाम्या रानात मक्याची लागवड करून टप्प्याटप्प्याने त्याचा चारा करून वापरत आहेत.
तालुक्यात अनेक गावात खासगी दूध संकलन संस्था आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्याचा मजूर वर्ग पशुपालन करत आहेत. शेणखत मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे बाळगली आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे चारा म्हणून वापरणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी सध्या चाराटंचाई जाणवत आहे. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी चारा टंचाई भासू नये, म्हणून चारा पिके घेत आहेत. जनावरांना दूधवाढीसाठी मका, हिरव्या चाऱ्यासह ज्वारीचा कडबा, कडबा कुट्टी खरेदी करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून परिसरात अतिवृष्टी होत असल्याने आताच चाऱ्याची साठवणूक करत आहेत. शेतकऱ्यांचा मकाच्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी करण्याकडे कल असून हवाबंद बॅगेत साठवणूक करीत आहेत. मक्याच्या हिरव्या चाऱ्याच्या एका सरीची किंमत ३००ते ४०० तर ज्वारीच्या कडबा प्रति पेंड्या ३ ते ४ हजार रुपये प्रमाणे आहे. तर ४५ किलो कडबा कुट्टी ६०० प्रमाणे विक्री केली जात आहे.
——————————————————————–
‘माझ्याकडे दुधाळ गायी व म्हशी आहेत. त्यांना हिरवा चारा मोठ्या प्रमाणावर लागतो. मात्र पावसामुळे चारा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी महिन्यापूर्वीच ज्वारीचा कडबा खरेदी केला आहे. शिवाय पाण्याची सोय असल्याने शेतात मक्याची लागवड केली आहे.’
– रावसाहेब जनवाडे, पशुपालक, शेतकरी बेनाडी

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *