Sunday , June 28 2026
Breaking News

दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : दुचाकीवरून ताबा सुटल्याने दुभाजकाला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वडणगे, पाडळी (ता. करवीर) येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दत्तात्रय परसू पाटील (वय ५१) असे त्याचे नाव आहे. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दत्तात्रय पाटील हे आपल्या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी निपाणीला आले होते. विवाह आटोपून ते दुचाकीवरून गावाकडे परतत होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी फाट्यावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुभाजकाला धडक बसल्याने ते खाली‌ कोसळून गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर येथील महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमोपचार करून अधिक उपचारासाठी‌ कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत पत्नी ज्योती पाटील यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद
दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *