Wednesday , November 29 2023
Breaking News

खानापूर

महामेळावा यशस्वी करणारच : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई होते. यावेळी कर्नाटक सरकारने बेळगांव येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे खानापूर तालुका म. …

Read More »

पारिश्वाडनजीक दुचाकी अपघातात कामशिनकोपचा युवक ठार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील पारिश्वाड नजीक पारिश्वाड -खानापूर रस्त्यावर तलावानजीक रात्रीच्या सुमारास दुचाकीला झालेल्या अपघात कामशीनकोप येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर युवकाचे नाव विठ्ठल गीड्डापणावर असे आहे. सदर युवक आपल्या दुचाकीवरून पारिश्वाडहून आपल्या गावाकडे जात असता अज्ञात वाहनाच्या ठोकरीत तो ठार झाल्याचे कळते. घटनास्थळी खानापूर …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथील होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव …

Read More »

बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. २६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील मच्छे औद्योगिक वसाहत, देसूर, झाडशहापूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किंणये, संतिबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, मार्कडेयनगर, वाल्मिकीनगर, तीर्थकुंडये, हुंचेनट्टी, …

Read More »

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; शिवोलीचा युवक जागीच ठार

  खानापूर : बेळगावहून खानापूरकडे दुचाकीवरून जात असताना देसूर अल्मानजीक महामार्गावर रस्त्या बाजूला थांबलेल्या एका निलगिरी लाकडे वाहू ट्रकला दुचाकीची जोरात धडक बसल्याने शिवोली येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव पंकज नारायण जांबोटकर (वय 23) रा. शिवोली ता. …

Read More »

घरावर पत्रे घालताना खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

  खानापूर : घरावर पत्रे घालताना तोल जाऊन खाली पडल्याने कौंदल येथील अनंत मारूती कुरूमकर (वय‌ 36) यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10-30 वाजता  घडली आहे.. याबाबत समजलेली माहिती अशी की, अनंत मारूती कुरूमकर यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय असून, ते एका घरावर फॅब्रिकेशनचे काम करत होते. त्यावेळी पत्रे चढवत असताना …

Read More »

खानापूर येथील महिलेचे चार तोळे सोने लंपास

  खानापूर : निपाणी बस स्थानकातून बेळगाव प्रवास करून पुढील प्रवासासाठी अळणावर बसमध्ये चढत असताना खानापूर येथील महिलेच्या पर्समधील चार तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर येथील प्रतिभा मंजुनाथ सक्री नामक महिला बेळगाव येथून अळणावर बसने खानापूरला प्रवास करीत होती त्यावेळी …

Read More »

खानापूर तालुक्यातील सन्नहोसूर गावात भरदिवसा चोरी!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील सन्नहोसूर गावात दोन घरात, भरदिवसा चोरी झाली असून चोरट्यांनी एका घरातून 10 तोळे सोने व 25 तोळे चांदी तर दुसऱ्या एका घरातून 5 तोळे सोने व 10 तोळे चांदीचे दागिने लंपास केले असल्याची घटना काल सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. याबाबत समजलेली माहिती अशी की, …

Read More »

खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेला आग

  खानापूर : खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेला अचानक आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकेचे महत्त्वाचे कागदपत्रे कम्प्युटर व फर्निचर इत्यादी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. सुदैवाने पैसे ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम पर्यंत आग पोहोचू शकली नाही. अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झाले असून आग …

Read More »

शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहून शिवप्रेमीत संचारला उत्साह

  पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला प्रचंड गर्दी खानापूर : खानापूर येथील शिव स्वराज जनकल्याण फाउंडेशनतर्फे लोकमान्य भवन येथे शुक्रवारपासून आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी शनिवारी व रविवारी अनेक शाळांनी विशेष सहलींचे नियोजन केले आहे त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची …

Read More »