Wednesday , November 25 2026
Breaking News

खानापूर

काळादिन जनजागृतीसाठी खानापूर तालुका म. ए. समितीची पत्रक वाटप मोहीम

  २५ ऑक्टोबरला खानापूर शहरात, तर २७ व २८ ऑक्टोबरला जांबोटी आणि नंदगडमध्ये जनजागृती खानापूर : येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळादिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पत्रक वाटप मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील राजा शिवछत्रपती स्मारकापासून मोहिमेला …

Read More »

खानापूर–लोंढा महामार्गावर भीषण अपघात; विनोद गुरव यांचा मृत्यू

  धोकादायक वळणावर कार दोन पलट्या खाऊन उलटली; दोन चिमुकल्या मुलींवरील पितृछत्र हरपले खानापूर : खानापूर–लोंढा महामार्गावर वाटरे आणि जोमतळे गावांदरम्यान गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री झालेल्या भीषण कार अपघातात गुंजी (ता. खानापूर) येथील विनोद संभाजी गुरव (वय ३९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धोकादायक वळणावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दोन …

Read More »

ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील महिला कबड्डीपट्टूंची राष्ट्रीय स्तरावर रोमहर्षक धडक

  खानापूर : खानापूरच्या ताराराणी महाविद्यालयाच्या तीन कबड्डीकन्यांची राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेसाठी ऐतिहासिक निवड झाली असून मध्य प्रदेशातील ३७ व्या अखिल भारतीय स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्र संघाकडून खेळताना दिव्या शिरोडकर, रेणुका गुरव आणि पल्लवी पाटील यांच्या चढाया अन् पकडीच्या अफाट कौशल्याच्या जोराव गाजवली. कबड्डीची अद्ययावत मैदाने, हरियाणाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील थराराने उंचावली …

Read More »

बेकवाड येथे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

  महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासह हिंदू धर्म आणि संस्कृतीवर मार्गदर्शन बेकवाड : बेकवाड येथे आज हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती किरण मुतकेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रवीणा सुनील फटाण, महिला मोर्चा जिल्हा ग्रामीण सचिव, बेळगाव, माधुरी दोडवाई (डीपीके रेंज फॉरेस्ट ऑफिस, नंदगड) आणि कल्याणी बसुरतेकर, व्याख्यात्या, …

Read More »

दोड्डहोसूर येथे इनोव्हाच्या धडकेत ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

  कुत्र्याला फिरवण्यासाठी गेले असताना अपघात खानापूर : खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावाच्या वेशीवर गुरुवारी रात्री भरधाव इनोव्हा कारने धडक दिल्याने विजय नागेश अनगोळकर (वय ६४) यांचा मृत्यू झाला. ते आपल्या कुत्र्याला घेऊन रस्त्याच्या कडेला फिरत असताना रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. विजय अनगोळकर यांचे घर दोड्डहोसूर येथील शाळेजवळ असून …

Read More »

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या सर्व जागा लढवणार असा एकमुखी ठराव आज झालेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. 19 ऑक्टोबर नंतर निवडणूकीची तारीख निश्चित झाल्यानंतर खानापूर तालुका समितीकडून इच्छुक अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला …

Read More »

दुष्काळग्रस्तांच्या यादीत खानापूरचा समावेश

राज्यातील आणखी नऊ तालुक्यांना दिलासा; दुष्काळी तालुक्यांची संख्या २२६ वर बेळगाव : राज्यात पिकांचे नुकसान आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनत असताना, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत बेळगाव जिल्ह्यातील खानापूरसह आणखी नऊ तालुक्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २२६ वर पोहोचणार आहे. नव्या यादीत बेळगाव …

Read More »

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी खानापूरमध्ये काँग्रेसचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

  डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन खानापूर : लोकशाही मूल्यांचे रक्षण, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने बुधवारी तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे …

Read More »

खानापूर-बेळगाव महामार्गावर भीषण अपघात; पेपरच्या ट्रकचे दोन तुकडे, चालक सुदैवाने बचावला!

  कुपटगिरी रस्त्यावरील पुलावर पहाटे दुर्घटना; ४०० ते ५०० मीटरपर्यंत पेपरचे बंडल विखुरले खानापूर : खानापूर-बेळगाव नवीन महामार्गावरील जुन्या कुपटगिरी रस्त्याच्या पुलावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे पेपरचे बंडल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकचा पुढील इंजिनचा भाग आणि मागील मालवाहू भाग वेगळे झाले. …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची १५ ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक

  जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांची रणनीती आणि १ नोव्हेंबरच्या काळादिन आंदोलनावर होणार चर्चा खानापूर : आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांसह १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळादिन आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. खानापूर येथील …

Read More »