






निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे उपपंतप्रधान व महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या अस्मितेचे प्रतिक दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची बुधवारी (ता.२५) ४२ वी पुण्यतिथी झाली. त्यानिमित्त शहरातील देवचंद काॅलेज जवळ असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रामदेव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी, दिवंगत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान महत्त्वाचे आहे. याशिवाय कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांसाठी त्यांनी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. शिवाय शैक्षणिक क्षेत्रात त्यांची कामगिरी चांगली असल्याने सीमा भागातील विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याचे सांगितले प्रा. डॉ. राहुल घटेकरी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास निवृत्त प्रा. नानासाहेब जामदार, विठ्ठल वाघमोडे, कबीर वराळे, सुधाकर माने, अशोक खांडेकर, नंदकुमार राजीगरे, तुकाराम कोळी, देवचंद काॅलेजचे डॉ. पंडीत शिरगावे, डॉ.एल.पी. लंका, आर. एम. कोळी, पी.डी. पोवार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta