






इच्छुकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
निपाणी (वार्ता) : निवडणूक आयोगाने जिल्हा आणि तालुका पंचायतसाठी आरक्षणाची घोषणा केली आहे. निपाणीमधील आरक्षण ‘जैसे थे’ असल्याने इच्छुकांनी सोडला सुटकेचा निश्वास सोडला आहे.
१५ डिसेंबरपर्यंत निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या हालचाली गतिमान होणार असून निवडणुकीच्या धुरळा उडणार आहे.
बऱ्याच दिवसापासून अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या घोषणाकडे लक्ष केंद्रित केले होते. तर काहींनी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. आज ना उद्या आरक्षण येईल या आशेने उमेदवार राजकीय नेते मंडळींच्या सहवासात दिसत होते. आता आरक्षण आल्याने गावागावात राजकीय बैठका होणार आहेत. शिवाय आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळीकडे मनधरणी होणार आहे.
——————————————————————–
जिल्हा पंचायत आरक्षण
कारदगा : सामान्य : मानकापूर, कारदगा, ढोणेवाडी, मांगुर, बारवाड
कोगनोळी : सामान्य : कुन्नूर, बेनाडी, आडी, कोगनोळी
बेडकीहाळ : ओबीसी अ महिला : बेडकीहाळ, चांद शिरदवाड, भोज, सिदनाळ हुन्नरगी, गळतगा
सौंदलगा : ओबीसी अ महिला : आप्पाचीवाडी, कुर्ली सौंदलगा, यमगर्णी, कोडणी
अक्कोळ : अनुसूचित जाती (एससी) : अक्कोळ, ममदापूर (के.एल.) लखनापूर, यरनाळ, शिरगुप्पी, शेंडूर
——————————————————————
निपाणी तालुक्यातील पंचायत मतदारसंघ आणि आरक्षण
अक्कोळ : ओबीसी अ महिला : अक्कोळ, (ममदापूर के. एल.)
बेनाडी : सामान्य : बेनाडी, बोळेवाडी
आप्पाचीवाडी : सामान्य महिला : आप्पाचीवाडी, हदनाळ, मत्तीवडे, सुळगाव
आडी : सामान्य : आडी, जैनवाडी, हंचिनाळ (के.एस.)
बेडकीहाळ : एस. सी. महिला : बेडकीहाळ, चांद शिरदवाड
कुर्ली : सामान्य : कुर्ली, भाटनांगनूर
कोगनोळी : एस.सी. : कोगनोळी, हणबरवाडी
कुन्नूर : सामान्य महिला : कुन्नूर, गजबरवाडी,शिवापूरवाडी
कोडणी : सामान्य : कोडणी, गायकवाडी
कारदगा : ओबीसी अ महिला : कारदगा, ढोणेवाडी, बोरगाववाडी
सौंदलगा : ओबीसी : सौंदलगा, भिवशी
जत्राट : एस.टी. महिला : जत्राट, श्रीपेवाडी, लखनापूर, पडलीहाळ
मानकापूर : सामान्य महिला : मानकापूर कसनाळ
गळतगा : एस.सी. महिला : गळतगा, भीमापूरवाडी, दिलालपूरवाडी
मांगुर : ओबीसी अ : मांगुर, बारवाड
यमगर्णी : सामान्य महिला : यमगर्णी ,बुदिहाळ, नांगनूर
यरनाळ : सामान्य : यरनाळ, अंमलझरी, तोंडी, गव्हाण
शिरगुप्पी : ओबीसी अ महिला : शिरगुप्पी, बुदलमुख, पांगिरे -बी, गोंदुकुप्पी
हुन्नरगी : सामान्य : सिदनाळ, हुन्नरगी
Belgaum Varta Belgaum Varta