Wednesday , November 25 2026
Breaking News

महामेळावा यशस्वी करण्यासाठी तालुकाभर जनजागृती करण्याचे खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन

Spread the love

 

२ डिसेंबरच्या महामेळाव्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (ता. २४) श्री राजा शिवस्मारक, खानापूर येथे समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. येत्या २ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणारा महामेळावा यशस्वी करण्यासाठी तालुकाभर जनजागृती करून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी समितीचे सरचिटणीस आबासाहेब नारायणराव दळवी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. सीमाभागातील जनतेची महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची भावना कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महामेळाव्याच्या यशस्वितेसाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी गोपाळ मुरारी पाटील, मारुतीराव परमेकर, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, राजाराम देसाई, पांडुरंग सावंत, जयराम देसाई, जगन्नाथ बिरजे, पुंडलिक पाटील, विलास बेळगावकर, धनंजय पाटील आणि गणपती पाटील (पुणे) यांनी मनोगत व्यक्त केले. २ डिसेंबरचा महामेळावा नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात गोपाळराव देसाई यांनी महामेळाव्याच्या आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी आभार मानले.

बैठकीला राजेंद्र कुलम, ब्रह्मानंद पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, संजीव पाटील, बी. बी. पाटील, डी. एम. भोसले, जयसिंगराव पाटील, सातेरी पाटील, अजित पाटील, बाळासाहेब शेलार, विनायक चव्हाण, नाना घाडी, वसंत नावलकर, रवींद्र शिंदे, म्हात्रू धबाले, नामदेव गोरे, दत्तू कुट्रे, शिवाजी पाटील, सुहास हुद्दार, उमेश पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *