






निपाणी (वार्ता) : निपाणी येथील न्यायालयीन परिसरात कामानिमित्त येणाऱ्या पक्षकार आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी निपाणी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.संजय वैराट यांनी सरकारी कॅन्टीन सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांची दखल घेऊन कॅन्टीन सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन ॲड. वैराट यांच्या हस्ते पार पडले.
कॅन्टीन आता न्यायालय परिसरातील नागरिक व वकिलांच्या सज्ज झाले आहे. परिसरात चहा-नाश्त्याची आणि जेवणाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने दूरवरून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. कॅन्टीनचे कंत्राट किरण कणगले यांना मिळाले आहे.
या ठिकाणी स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थांची सोय ग्राहकासाठी उपलब्ध झाले आहे. यावेळी ऊद्योजक सुरेश शेट्टी, ॲड. एस. एस. बन्ने, एन. एम. वराळे, ॲड. एम. बी. दिवाळे, ॲड. रवी संकपाळ, शशी नेसरे, लक्ष्मण अंमलजरे, ॲड. उदय जिनगे, ॲड. अलोक सातवार, उदय खोत, किरण कणंगले, प्रदिप कणंगले यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य वकील आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta