Wednesday , November 25 2026
Breaking News

नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या घरावर पुन्हा हल्ला!

Spread the love

 

भांदूर गल्लीतील निवासस्थानाच्या दरवाजाची तोडफोड; लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बेळगाव : शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींचे धाडस वाढत चालल्याचे चित्र समोर येत असतानाच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या निवासस्थानावर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भांदूर गल्ली येथील त्यांच्या घराच्या मागील दरवाजावर रविवारी रात्री लाथा मारून तोडफोड करण्यात आली. लोकप्रतिनिधींचे निवासस्थानही सुरक्षित नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी भातकांडे यांच्या घराला लक्ष्य केले. घराच्या मागील दरवाजावर जोरदार लाथा मारून त्याची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर भातकांडे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

विशेष म्हणजे, गणेशोत्सव काळातही भातकांडे यांच्या घराच्या समोरील दरवाजाची तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेनंतर पुन्हा एकदा त्यांच्याच घराला लक्ष्य करण्यात आल्याने हा प्रकार केवळ तोडफोडीपुरता मर्यादित आहे की यामागे अन्य काही हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे भातकांडे कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

लोकप्रतिनिधींच्या घरावर वारंवार हल्ले होऊनही अशा प्रवृत्तींना आळा बसत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन हल्लेखोरांचा तातडीने शोध घ्यावा, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांना स्मशानभूमीतच सोडून शववाहिनी चालकाचा काढता पाय!

Spread the love  दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांची फरफट बेळगाव : सार्वजनिक सेवांमधील असुविधांचा फटका नागरिकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *