Wednesday , November 25 2026
Breaking News

चव्हाट गल्लीत यूजीडीच्या निकृष्ट कामाचा फटका; दूषित पाणी विहीर, बोरवेलमध्ये मिसळले!

Spread the love

महिलांचा संताप; महापालिका अभियंत्यांकडून पाहणी, तातडीने दुरुस्तीचे आश्वासन

बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरात नव्याने टाकण्यात आलेल्या भूमिगत गटार (यूजीडी) पाईपलाईनच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेज चेंबरच्या सदोष बांधकामामुळे गटारातील दूषित पाणी विहीर, बोरवेल तसेच पिण्याच्या नळाच्या पाण्यात मिसळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून बुधवारी सकाळी स्थानिक महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.

चव्हाट गल्ली येथे नुकतेच यूजीडी पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, चेंबरचे बांधकाम योग्य पद्धतीने न झाल्याने त्यातून सांडपाणी झिरपत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी या समस्येकडे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर बुधवारी सकाळी महापालिकेच्या अभियंत्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली.

पाहणीनंतर अभियंत्यांनी ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करून दूषित पाण्याची समस्या लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र, काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांना स्मशानभूमीतच सोडून शववाहिनी चालकाचा काढता पाय!

Spread the love  दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांची फरफट बेळगाव : सार्वजनिक सेवांमधील असुविधांचा फटका नागरिकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *