






बेळगाव – रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यावतीने सोळाव्या रोटरी बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवार दिनांक 6 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. ‘कॅन्सर विरुद्ध उठा, धावा आणि एकत्र’ या या घोषवाक्यसह सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 4000 स्पर्धक भाग घेतील असा विश्वास रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष शशीधर पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलावून दाखविला.
यावेळी पुढे बोलताना शशीधर पाटील म्हणाले, रोटरी वेणुग्राम वतीने देशाच्या विविध भागातील धावपटू, फिटनेस प्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांना आरोग्य चिकित्सेविषयी प्रोत्साहित करण्यासाठी सदर स्पर्धा आयोजित केली जात आहे. 21 km, 10 km, 5 km आणि 3 km फन रन अशा एकूण चार वेगवेगळ्या गटात स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सावंतवाडी येथील अकरा वर्षांचा कबीर तसेच तामिळनाडू येथील 97 वर्षीय जनार्दन हे देखील सहभागी होणार आहेत.
सदर स्पर्धा आयोजित करण्यासाठी मदनकुमार एस भैरप्पानावर फाउंडेशन यांच्यासह अन्य संस्था आणि कंपन्यांनी सहकार्य केले आहे. सदर स्पर्धेत बेळगाव तील नागरिक रनिंग क्लब विद्यार्थी कार्पोरेट संस्था आणि फिटनेस प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन फिटनेस आणि कॅन्सर जनजागृतीचा संदेश पसरविण्यात सहकार्य करावे असे आवाहन नाही शशीधर पाटील आणि इव्हेंट चेअरमन कुंदन यांनी केले.
यावेळी रोटरी वेणूग्रामचे सेक्रेटरी मल्लिकार्जुन मुरगुडे, अभिनंदन हुद्दार, सुजित कणबर्गी, संजीव देशपांडे, डी बी पाटील, डॉक्टर हंजी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते स्पर्धेच्या टी-शर्ट चे अनावरणही यावेळी करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta