Wednesday , November 25 2026
Breaking News

महात्मा फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा 2026 उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 24 नोव्हेंबर 2026 रोजी दरवर्षीप्रमाणे महात्मा फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व मराठी विद्यानिकेतन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेसाठी बेळगाव व चंदगड परिसरातून 62 विद्यार्थी हजर होते.
या स्पर्धेचे उद्घाटन महात्मा फुले दांपत्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रा.प्रसाद वाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विद्यानिकेतन शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, मराठा महिला संघाच्या अध्यक्षा डाॅ. संजीवनी खंडागळे, पंडित नेहरू कॉलेजचे प्रा. मयूर नागेनट्टी, भाऊराव काकतकर कॉलेजचे प्रा.प्रसाद वाडेकर यांनी केले. स्पर्धेसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची सद्य परिस्थितीत गरज आहे का?, एल निनोचे संकट आणि समाज प्रबोधन, डॉ. शिवाजी दादा कागणीकर यांचे कार्य हे विषय स्पर्धेसाठी होते.
यावेळी प्रथम क्रमांक श्रेया सुरेश काकतकर (जिजामाता हायस्कूल चव्हाट गल्ली), द्वितीय क्रमांक प्रेरणा विजय पाटील (मराठी विद्यानिकेतन बेळगाव), तृतीय क्रमांक भक्ती गंगाराम केन्नुरकर (वाघवडे हायस्कूल वाघवडे), उत्तेजनार्थ क्रमांक गौतम विनोद डिचोलकर(राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी), तृप्ती यशवंत म्हाकेकर (भाई दाजीबा देसाई हायस्कूल पार्ले), सृजन अनिल पाटील (मराठी विद्यानिकेतन बेळगाव), समृद्धी परशराम पाटील (शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी), कृतिका लक्ष्मण मोहनगेकर (सरस्वती हायस्कूल हंदिगनूर) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षक समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, आंतरशालेय स्पर्धा विभाग प्रमुख मुक्ता आलगोंडी, शाहीन शेख, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, संगणक विभाग प्रमुख श्रुती बेळगावकर, अटल लॅब प्रमुख श्वेता सुर्वेकर यांनी परिश्रम घेतले. 28 नोव्हेंबर 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीदिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरजसिंह राजपूत यांनी केले. तर आभार माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

रोटरी वेणग्राम वतीने १६ व्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Spread the love  बेळगाव – रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यावतीने सोळाव्या रोटरी बेळगाव हाफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *