






चिक्कोडी शहराबाहेरील घटना; दुसऱ्या विवाहाला विरोध केल्याचा संशय

बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेच्या डोक्यावर दगड घालून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना चिक्कोडी शहराच्या बाहेरील परिसरात उघडकीस आली आहे.
ऐरावती खोत (वय ४०, रा. नांदिवडे, जि. बेळगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऐरावती आणि संजू नामक व्यक्ती यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हे दोघेही एकाच हॉटेलमध्ये काम करत असल्याचे समजते.
संजू दुसरा विवाह करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ऐरावतीने त्याला विरोध केला होता. याच कारणातून तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चिक्कोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta