






निपाणी (वार्ता) : त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त निपाणी येथील आश्रय नगरातील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये मंगळवारी (ता.२४) कार्तिक स्वामी दर्शन सोहळा पार पडला. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पहाटे कार्तिक स्वामींच्या मूर्तीस राहुल भाटले यांच्या हस्ते अभिषेक झाला. त्यानंतर दर्शनासाठी दिवसभर मंदिर खुले करण्यात आल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
सोमवारी (ता.२३) रात्री संत बाळूमामा संगीत भजनी मंडळाची भजन सेवा झाली. मंगळवारी (ता.२४) सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे वाटप महाप्रसादाचे वाटप झाले. दुपारी ३ वाजता रांगोळी स्पर्धां पार पडल्या. त्यातील विजेत्यांना अनुक्रमे २ हजार १ रुपये, १ हजार १ रुपये, ७०१ रुपये आणि ५०१ रुपयांची बक्षिसे देण्यात आली. सायंकाळी ७ वाजता कार्तिक दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास प्राणालिंग स्वामी, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, आकाश माने, प्रकाश तारळे, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, शितल भाटले, स्वप्निल खोत, अरविंद पारळे, अक्षय यमगेकर, विनायक पाटणकर, भैरू आंबोले, संजय पठाडे, विजय भाटले, विनायक पाटणकर, सुहास कोरडे, स्वप्निल खोत, सचिन डांगरे, वासुदेव उरुणकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta