






बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रतिउत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांचा महामेळावा घेण्यात येतो. हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार दिनांक 27 रोजी दुपारी ठीक 2. 00 वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्ण विधानसभा येथे बुधवार दिनांक 2 डिसेंबरपासून होत आहे. या हिवाळी अधिवेशनाला प्रतिउत्तर देण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वतीने पहिल्या दिवशी महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी कार्यकर्त्यांचे विचार आजमावण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, मराठीकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस अँड एम जी पाटील, कार्याध्यक्ष आर एम चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta