Wednesday , November 25 2026
Breaking News

कॅम्प परिसरातील रस्ते व ड्रेनेज विकासकामांचा शुभारंभ

Spread the love

 

आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या प्रयत्नातून ६ कोटींचा निधी मंजूर

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते आणि युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत कॅम्प कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते व ड्रेनेज विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) माध्यमातून ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून ही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

या प्रकल्पांतर्गत सुमारे १.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये डांबरीकरण व काँक्रीट रस्त्यांचा समावेश असून, ४०० मीटर काँक्रीट रस्ता आणि सुमारे ८०० मीटर लांबीच्या काँक्रीट ड्रेनेजचे कामही करण्यात येणार आहे. कॅम्प परिसरातील कॅटल रोड, बेवकूर रोड आणि कॅम्प हाय स्ट्रीट या प्रमुख मार्गांवर ही कामे केली जाणार आहेत.

या विकासकामांमुळे परिसरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासोबतच पावसाळ्यातील पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

यावेळी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मांचलवार सुदाम हरिविजय यांनी आमदार आसिफ (राजू) सेठ यांचे आभार मानले. कॅन्टोन्मेंट बोर्डाला निधीअभावी आवश्यक विकासकामे राबविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आमदारांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ६ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने या कामांना सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी बेळगाव शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासासाठी भविष्यातही अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरी सुविधांचा विस्तार हे आपले प्रमुख प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला युवा नेते अमान सेठ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य गौस धारवाडकर, रिझवान बेपारी, अलादीन किल्लेदार, साजिद शेख यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

या ६ कोटींच्या विकासकामांमुळे कॅम्प परिसरातील रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांना स्मशानभूमीतच सोडून शववाहिनी चालकाचा काढता पाय!

Spread the love  दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांची फरफट बेळगाव : सार्वजनिक सेवांमधील असुविधांचा फटका नागरिकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *