Monday , July 27 2026
Breaking News

खानापूर

चापगाव जल जीवन मिशन कामांबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; चौकशीची मागणी

  खानापूर : चापगाव ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन (JJM) अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आणि अपूर्णता असल्याचा आरोप करत माजी पंचायत अध्यक्ष रमेश मल्हारी धबाले व ग्रामस्थांनी तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या या योजनेवर मोठ्या …

Read More »

शिवाजीनगर अपघातातील जखमी सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती दळवी यांचे निधन; मणतुर्गा येथे आज अंत्यसंस्कार

  खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवार (दि. २३ जून २०२६) रोजी रात्री ८ वाजता मूळ गावी मणतुर्गा (ता. खानापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी …

Read More »

खानापूर शिवाजीनगरात दोन दुचाकींची भीषण धडक; सेवानिवृत्त पोस्टमास्तर गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (दि. २२ जून २०२६) दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८, रा. मणतुर्गा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. …

Read More »

मणतुर्गा–गावठाण रस्त्याचा मार्ग मोकळा; प्रशासन, शेतकरी आणि काँग्रेसच्या चर्चेतून सामंजस्याने तोडगा

  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव यांच्या सूचनेनुसार मणतुर्गा गाव ते गावठाण रस्ता प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण मिळाले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासन, शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. आज दुपारी १२ वाजता तहसीलदार, सर्वे विभागाचे अधिकारी, पीडीओ, काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार तसेच …

Read More »

स्वत:च्या अपंगत्वालाच बलस्थानी ठेऊन परशराम गुरव बनले बस्तवाडच्या पंचक्रोशीतील पहिला वकील!

  खानापूर : बस्तवाड तालुका खानापूर येथील प्रशांत उर्फ परशराम हे क्लास टू शासकीय अधिकारी नोकरीत राहून अभ्यासाची कास घट्ट धरून रत्नागिरी येथील कायदा महाविद्यालच्या नुकताच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कायदा परीक्षेत उत्तम गुणवतेसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून बस्तवाड, करजगी, मेरडा, हलगा, किरहलशी, जांभेगाळी, देवराई या पंचक्रोशीतील पहिले वकील …

Read More »

“माझ्या पराभवामागे संगनमत होते का?” – माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल

  बेंगळुरू / खानापूर : कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून, खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “माझ्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामागे संगनमत होते का? मला राजकीय बळीचा बकरा बनवण्यात आले का?” असा थेट …

Read More »

खानापूर येथे म. ए. समितीविरोधात प्रशासनाला निवेदन

  खानापूर : २२ जून रोजी म. ए. समितीने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्थानिक संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या खानापूर तालुका घटकाच्या वतीने तहसीलदारांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. २२ जून रोजी होणाऱ्या आंदोलनामुळे सीमाभागातील कायदा व …

Read More »

काटगाळीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला; महिला व बालविकास विभागाची तात्काळ कारवाई

  खानापूर : खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू असताना महिला व बालविकास विभागाने वेळेवर हस्तक्षेप करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले. स्पंदना स्वयं-सहाय्यता समूहाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच महिला व बालविकास विभागाचे सीडीपीओ विक्रम यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. …

Read More »

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खानापूर प्रशासन सतर्क; आपत्ती निवारण पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना कडक इशारा

  खानापूर : मान्सून काळात उद्भवू शकणाऱ्या पूर व इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी खानापूर तालुका प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला असून, तालुका पंचायत सभागृहात आपत्ती निवारण पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनात …

Read More »

कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियान

  नंदगड : कन्नड फलक सक्तीविरोधात २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बुधवारी नंदगड येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी बाजारपेठेसह विविध गल्ल्या आणि परिसरातील अन्य ठिकाणी पत्रके वाटून नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य …

Read More »