Friday , October 23 2026
Breaking News

खानापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन व समस्या निवारण सभा

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता तालुका पंचायत कार्यालय, खानापूर येथे मार्गदर्शन व समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुका पंचायत खानापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या सभेत केंद्र व राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या विविध सुविधा, सवलती, हक्क आणि संरक्षण यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.

खानापूर दिवाणी न्यायालयातील मार्गदर्शक वकील यावेळी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन करणार आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती तसेच विविध समस्यांच्या निवारणासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

खानापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी तसेच शासकीय सुविधा, सवलती आणि संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी या सभेला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी आणि प्रधान कार्यदर्शी सी. एस. पवार यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *