Monday , July 27 2026
Breaking News

खानापूर

खानापूर समितीची जांबोटी भागात कन्नडसक्ती विरोधी मोर्चाची जनजागृती

  खानापूर : येत्या २२ जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर कन्नडसक्ती विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी आज मंगळवार दिनांक १६ जून रोजी जांबोटी बाजारपेठमध्ये मोर्चाच्या जनजागृतीसाठी जागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. हजारोंच्या संख्येने २२ जूनच्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात भाग घेऊन हा मोर्चा यशस्वी …

Read More »

मराठी शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा; खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कन्नड, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांची पुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना मराठीची पुस्तके का उपलब्ध नाहीत किंवा त्यांची छपाई का करण्यात आली नाही, असा सवाल …

Read More »

मराठी शाळांतील कन्नड सक्तीविरोधात खानापूर तालुका समितीच्या वतीने सोमवारी क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता शिवस्मारक येथे २२ जून रोजी कन्नडसक्ती विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटायची आहेत तसेच माडीगुंजी येथील शाळेत होऊ घातलेल्या कर्नाटक पब्लिक स्कूलमधील कानडीकरणाविषयी क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे ठरले आहे. तरी …

Read More »

डिगेगाळी – जटगे परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार

  खानापूर : ऐन पेरणीच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने डिगेगाळी–जटगे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जटगे येथील शेतकरी राजाराम रामचंद्र पाटील यांचा बैल वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम पाटील हे आपल्या बैलासह डिगेगाळी परिसरातील शिवारात …

Read More »

घनदाट जंगलात वाट चुकलेल्या वृद्धाला वनविभागाचे जीवदान; रात्रभर चाललेल्या शोधमोहीमेला यश

  खानापूर : घनदाट जंगलात गुरे चारताना वाट चुकून बेपत्ता झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा वनविभागाने तब्बल दहा तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर सुखरूप शोध लावला. वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या भीमगडच्या जंगलात रात्रभर सुरू असलेल्या या धाडसी मोहिमेमुळे एका वृद्धाचे प्राण वाचले असून वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. खानापूर तालुक्यातील …

Read More »

हब्बनहट्टी खनिज वाहतूक प्रकरण तापले; विविध विभागांच्या भूमिकेवर संशय, चौकशीची मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी परिसरात सुरू असलेल्या खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणाने नवे वळण घेतले असून, ओव्हरलोड वाहनांची वाहतूक, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि संबंधित शासकीय विभागांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही …

Read More »

शेतातून घरी परतताना तरुणावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती स्थिर

  कणकुंबी : तालुक्यातील कणकुंबी वनक्षेत्रातील हुळंद गावाबाहेर बुधवारी संध्याकाळी शेतकाम आटोपून घरी परतत असताना एका २५ वर्षीय तरुणावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महेश बाबू गावडे हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश गावडे हे शेतातील काम पूर्ण करून …

Read More »

20 वर्षांपासून बससेवेपासून वंचित गावांसाठी बस सुरू करण्याची मागणी; दलित संघर्ष समितीचे डेपो व्यवस्थापकांना निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मुडेवाडी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, सातनाळी, पिंपळी, मांजरपाई, माचाळी आणि घार्ली या गावांना गेल्या सुमारे 20 वर्षांपासून नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती (समन्वयक संघटना) यांच्या वतीने खानापूर येथील NWKSRTC बस डेपो व्यवस्थापक संतोष बेनकनकोप …

Read More »

बस सेवा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा

  खानापूर : शाळा व महाविद्यालयांना नुकतीच सुरुवात झाली आहे मात्र खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपुऱ्या बसवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बस सेवा सुरळीत करावी यासाठी परिवहन मंडळाला निवेदन देण्यात आले असून बस सेवा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे …

Read More »

हब्बनहट्टी बॉक्साईट वाहतुकीवर प्रश्नचिन्ह; ओव्हरलोड गाड्या, परवानग्या आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय

    खानापूर : हब्बनहट्टी परिसरातून सुरू असलेल्या कथित बॉक्साईट वाहतुकीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांच्या टिकाऊपणावर धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. सुमारे ५० टनांहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या १६ चाकी ट्रकांची नियमित ये-जा होत असल्याने आधीच खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यांची आणखी दुरवस्था होण्याची भीती नागरिक …

Read More »