Monday , July 27 2026
Breaking News

खानापूर

फेरमूल्यांकनानंतर झुंजवाड (के.एन.) येथील दिव्या देसाई 625 पैकी 625 गुणांसह कर्नाटकात संयुक्त अव्वल

  खानापूर : तालुक्यातील झुंजवाड (के.एन.) येथील कु. दिव्या प्रदीप देसाई हिने आपल्या चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर राज्यस्तरीय ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. फेरमूल्यांकनानंतर तिने 625 पैकी तब्बल 625 गुण मिळवत कर्नाटकात संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला. प्राथमिक निकालात दिव्याला 625 पैकी 624 गुण मिळाले होते. सर्व विषयांत शंभर पैकी …

Read More »

सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून पेन्शन सुरू करा : प्रसाद पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन

  21 हजार दिव्यांग, विधवा व वृद्धांच्या पेन्शनवर गंडांतर खानापूर : खानापूर तालुक्यातील सुमारे 21 हजार दिव्यांग, विधवा आणि वृद्धांच्या पेन्शनवर महसूल विभागाने स्थगिती दिल्याने संबंधित लाभार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी गर्लगुंजी …

Read More »

नागुर्डा येथे श्री नागेश महारुद्र मंदिराचा उद्घाटन सोहळा; आमदार श्री. रोहित आर. आर. आबा पाटील उपस्थित राहणार

  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा व विश्रांतवाडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील जिर्णोद्धार करण्यात आलेल्या स्थळ दैवत व ग्रामदैवत श्री नागेश महारुद्र मंदिराच्या पुनः प्राणप्रतिष्ठापना व भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १४ मे २०२६ ते शनिवार दि. १६ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या तीन दिवसीय धार्मिक …

Read More »

हलशी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरकडून रुग्णाला उद्धट वागणूक; रेशन कार्ड नसल्याने नाकारले उपचार

  खानापूर : सरकारी रुग्णालय हे गरिबांसाठी मंदिर असायला हवे, पण हलसीमध्ये रुग्णाला उपचारांऐवजी रेशन कार्ड विचारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून एका महिला नेत्याने डॉक्टरांची चांगलीच शाळा घेतली. खानापूर तालुक्यातील हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे दोन महिला रुग्ण अडचणीत आल्या. हत्तरवाड गावातील …

Read More »

बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजप महिला मोर्चा सचिव सौ. प्रवीणा फटाण यांचा सत्कार

  खानापूर : बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजप महिला मोर्चा सचिवपदी सौ. प्रवीणा सुनील फटाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्त खानापूर भाजप कार्यालयात सौ. प्रवीणा फटाण यांचा सत्कार आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण जिल्हा महिला मोर्चाच्या …

Read More »

दहावी परीक्षेत राज्यात संयुक्त पाचवा क्रमांक मिळवलेल्या अनुष्का देसाई हिचा आमदार विठ्ठल हलगेकरांकडून सत्कार

  खानापूर : तालुक्यातील विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. विशेषत मुली शिक्षणात आघाडी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. हलशीवाडी येथील अनुष्का रघुनाथ देसाई हिने दहावीच्या परीक्षेत ६२१ गुण मिळवत खानापूर तालुक्यात दुसरा क्रमांक …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई यांचा 67 वा वाढदिवस शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाला. श्री. गोपाळ देसाई यांचे बालपण कष्टात गेले. इच्छा असून देखील घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर भारतीय सैन्य दलात दाखल होऊन गोपाळ देसाई यांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून …

Read More »

“बापू गेले…”; अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांनी व्यक्त केल्या भावना

  मी दीड वर्षांचा असताना बापू मला आत्त्याकडं कोल्हापूरला सोडून गेले. गावात पोर राहिलं तर शहाणं होणार नाही म्हणून हेमंतला कोल्हापूरात ठेवला पाहिजे! जीजी बापूनं ह्रदयावर दगड ठेवला अन् नुकत्याच चालायला आणि बोलायला शिकलेल्या आपल्या पहिल्या अपत्याला आपल्या बहिणीकडं मला सोडलं. का तर याच मोठ्या बहिणीनं बापूंना ही शिकवून शहाणं …

Read More »

रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी खानापूर-जांबोटी मार्ग आजपासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  बेळगाव : खानापूर-जांबोटी रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गुरुवार, दि. ३० एप्रिल ते ५ मे पर्यंत असे सहा दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावले आहेत. या काळात खानापूरहून येणारी वाहने पिरनवाडी, कुसळी, जांबोटी रोडवरून वळविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. …

Read More »

दहावीमध्ये राज्यात दुसरा आलेल्या झुंजवाड येथील दिव्या देसाईचा शिवस्वराज संघटनेतर्फे सत्कार

  खानापूर : राज्यात दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणे ही खानापूर तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असून दिव्या देसाई हिने पुढील शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत चांगली कामगिरी करावी असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तसेच शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी केले आहे. दहावी परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेल्या …

Read More »