Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुका क्रीडा स्पर्धेत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाला चॅम्पियनशिप!

Spread the love

 

खानापूर : अभ्यासामध्ये अग्रेसर असण्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही नेहमीच नाव चर्चेत असणाऱ्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाने आता क्रीडा क्षेत्रातही आपले अभूतपूर्व वर्चस्व सिद्ध केले आहे. काल सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय मुगळीहाळ येथे पार पडलेल्या तालुका क्रीडा स्पर्धेत म. मं. ताराराणीच्च्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये अत्यंत चमकदार व सरस कामगिरी करत संपूर्ण तालुक्यात महाविद्यालयाचा नावलौकिक मिळवत मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव (हलगेकर) यांच्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेत अव्वल दर्जाचे खेळाडू निर्माण झाले पाहिजेत या अपेक्षेला नवी किणार मिळवून दिली आहे. या क्रीडा स्पर्धेत सुरवातीपासूनच ताराराणीच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. सांघिक खेळासह , धावणे, चालणे शिवाय बुद्धीबळापर्यंत प्रत्येक विभागात खेळाडू विद्यार्थिनींनी प्रतिस्पर्ध्यांना जिंकायची कोणतीही संधी न देता मैदान एक हाती मारले.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कबड्डी, खो खो क्रीडा-स्पर्धांमध्ये खेळाडूंची जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट खेळाच्या चालीवर या महाविद्यालयाच्या संघानी सांघिक खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
याच बरोबर रिले 4 × 100 मी. रिले आणि 4 × 400 मी. या दोन्ही प्रकारांत खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवत उज्ज्वल यश संपादन केल. वैयक्तिक धावणे प्रकारात अप्रतिम वेगाचे प्रदर्शन करीत 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत जयश्री गोडसे हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर 200 मी. मध्ये साक्षी देवलतकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत पल्लवी पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला.
800 मी. च्या धावण्याच्या प्रकारात अपेक्षा निलजकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर लक्ष्मी हंगिरकर हिने द्वितीय क्रमांक मिळवला. एवढेच नव्हे तर, 1500 मी. धावण्याच्या स्पर्धेत पुन्हा एकदा अपेक्षा निलजकर हिने प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले आणि 3000 मी. फास्ट वाॅक मध्ये स्वाती शिवटणकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
मैदानी क्रीडा प्रकारांमध्येही या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी ताकदीची व कौशल्याची चुणूक दाखवली. उंच उडीमध्ये प्रणाली पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला, लांब उडीमध्ये पल्लवी पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर तिहेरी उडीमध्ये पल्लवी पाटील हिने प्रथम आणि प्रणाली पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावत दोन्ही पदके आपल्या नावावर शिक्कामोर्तब केला. गोळाफेक स्पर्धेत रेणुका गुरव हिने प्रथम तर आसमा मकानदार हिने तृतीय क्रमांक मिळवला. थाळीफेकमध्ये रेणुका गुरव हिने द्वितीय क्रमांक पटकावला आणि भालाफेक स्पर्धेत मिनाक्षी गुरव हिने प्रथम क्रमांक मिळवून प्रथम क्रमांक पटकावला केवळ शारीरिक खेळांमध्येच नव्हे, तर बौद्धिक पातळीवरही आपल्या खेळाडूंनी मागे न राहता बुद्धीबळ (Chess) स्पर्धेत सानिका मेरवा आणि जोया सनदी यांनी उत्कृष्ट बौद्धिक चाली खेळत प्रथम क्रमांक पटकावले.

खेळाडूंचा खेळ पाहून करंबळचे कापड उद्योजक श्री महेश पाटील यांनी कब्बडी खेळाडूंना जर्शी व पॅंट पुरस्कृत केली आहे.

ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या सर्व विजयी क्रीडापट्टूंचे संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील ज्येष्ठ संचालक श्री. परशराम गुरव यांनी कौतुक केले असून क्रीडा शिक्षक श्री प्रशांत पांखरे कोच भरमाजी पाटील, भीमसेन यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांचे प्रोत्साहन मिळत असून, प्रा. नरसाप्पा पाटील, मंगल देसाई, रूद्राप्पा मरीतम्णवर सुनिता कणबरकर, तात्याजी जाधव, जयश्री शिवठणकर, पुंडलिक कर्लेकर व वनिता गावडे या सर्वांचे सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *