
निपाणी (वार्ता) : बोरगाव दूधगंगानदीला पाणी असतानाही बोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मिळणारा वीजपुरवठा ७ तासांवरून केवळ ३ तासांवर आणल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बोरगाव हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन केले. शासनाच्या नियमानुसार सकाळी ४ व रात्री ३ असे एकूण ७ तास वीज मिळणे अपेक्षित असताना, सध्या सकाळी केवळ २ व रात्री १ तासच वीजपुरवठा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अधिकारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुनील नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले.
शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब बसन्नवर म्हणाले, परिसरात अनेक दिवसांपासून शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, पूर्वी मिळणारा ७ तासांचा पुरवठा शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता कमी करून केवळ ३ तास करण्यात आला आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात वीजपुरवठा खंडित होत असल्याने पीके धोक्यात आली आहेत.
औद्योगिक वसाहतमध्ये वीजपुरवठा सुरळीत असताना शेती पंपांना वीज पुरवठा कमी केला आहे. यावेळी शेतकरी शिशिर सातपुते यांनीही संताप व्यक्त केला.
विभागीय अधिकारी संतन परेरा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कमी पावसामुळे राज्यात वीज समस्या निर्माण झाले आहे. मात्र सोलार व अन्य सिस्टीममधून वीजपुरवठा करीत असल्याचे सांगितले. आंदोलनात सुनील नांगरे- पाटील, रमेश मालगावे, आदिनाथ जंगटे, शांतिनाथ चौगुले, नैनेश पाटील, अभिनंदन फिरगन्नवर, अमित माळी, भरत हावले, पोपट मड्डे, पिंटू चौगुले, अभय पाटील, अबू परगोंड, समीर मांजरेकर, संदीप बसन्नवर, अजित सवाडे, अभयकुमार चौगुले, बंडू पाटील, गुंडा गोरवाडे, अमित हवले, शीतल सोबाने, शितल गोरवाडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्नाटक राज्य रयत संघ व शेतकरी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta