Sunday , September 20 2026
Breaking News

बोरगांव पूर्व भाग संघाला २१.२६ लाखाचा नफा

Spread the love

 

संस्थापक अण्णासाहेब हवले : संघाची २७ वी वार्षिक

निपाणी (वार्ता) : शेतकरी घटकांना सावरण्याचे काम कृषि संघ करीत आहे. त्यांचा आर्थिक विकास करण्यासह त्यांना सक्षम करणे हे कृषी संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि शून्य टक्के व्याजदराने मिळणाऱ्या शेती कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानून संघाने नेहमीच त्यांचे हित जोपासले आहे. त्यामुळे यंदा संघाला २१.२६ लाखाचा नफा झाल्याची माहिती संस्थापक अण्णासाहेब हवले यांनी दिली. बोरगाव येथील बोरगाव पूर्व भाग विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या २७ व्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन‌ झाले. मुख्य व्यवस्थापक शितल मगदूम यांनी अहवाल आणि नफा-तोटा अंदाजपत्रकाचे वाचन केले. सिद्धेश्वर बँकेचे संचालक सुरेंद्र पाटील व डॉ. शंकर माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
​संघाचे अध्यक्ष विद्याधर अम्मणावर यांनी संघाचे ९१३ सभासद, १ कोटी १ लाख लाखावर भाग भांडवल, १ कोटी ४३ लाखावर निधी, ७ कोटी ३९ लाख ठेवी, ३ कोटीवर गुंतवणूक, ८ कोटी ५१ लाखावर जिल्हा बँक व इतर कर्जे असल्याचे सांगितले.
​सभेस संघाचे उपाध्यक्ष अजित रोड्ड, संचालक दादासाहेब हवले, बाळासाहेब गोरवाडे, इमाम बुरके, आत्माराम गजरे, शब्बीर आवटी, विमल शेडशाळे, शाला मगदूम, सीमा निकम, नगरसेवक रोहित पाटील, अनुज हवले, विजय शिंगे, बाळासाहेब बसण्णावर, रावसाहेब तेरदाळे, शिवाप्पा माळगे, भाऊसाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, व्यवस्थापक अभय चिप्रे, सिद्धेश्वर संस्थेचे व्यवस्थापक संजय हवले, नंदकुमार हवले यांच्यासह संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *