
पारिश्वाड : पारिश्वाड व बडस क्रॉसकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या समस्येची दखल घेत श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने तसेच अध्यक्ष सोमेश नागोजी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी श्रमदानातून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली.
रस्त्याची कायमस्वरूपी डागडुजी करून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta