Sunday , September 20 2026
Breaking News

दिव्यांग संस्थेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; प्राणघातक हल्ल्याच्या तपासाला वेग देण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

Spread the love

 

बेळगाव : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनी दिले. दरम्यान, शहापूर येथील दिव्यांग संस्थेतील कथित गैरव्यवहार व भ्रष्ट कारभाराची माहितीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांसमोर मांडल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

बेळगाव येथे बेळगाव दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री. सचिन रामचंद्र पाटील यांनी पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसह शहापूर येथील संबंधित संस्थेच्या कथित भ्रष्ट कारभाराची सविस्तर माहिती आयुक्तांना देण्यात आली.

दरम्यान, सचिन पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा मुद्दा विशेष गांभीर्याने मांडण्यात आला. हल्ल्याच्या घटनेनंतर शहापूर पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाबाबत पोलिस निरीक्षकांकडून माहिती घेण्यात आली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कार्यवाही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त निकम यांनी तपासात कोणतीही दिरंगाई न करता हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सचिन पाटील यांच्यावरील हल्ल्याच्या तपासाला आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यावरच जीवघेणा हल्ला होणे ही गंभीर बाब असून, या घटनेमागील नेमके कारण आणि सूत्रधार कोण, याचा छडा लावण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच संस्थेतील कथित गैरव्यवहाराचीही निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे सभासद प्रशांत मन्नूरकर, गणेश साडेकर, दिनेश सहागावली, अनिल कालकुंद्रीकर आणि अशोक बांदिवडेकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *