
उपवनसंरक्षक प्रभाकर प्रियदर्शी; बागेवाडी महाविद्यालयातर्फे
१ हजार १११ रोपांची लागवड
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी लावलेले प्रत्येक रोपटे हरित भविष्याचे लक्षण आहे. वनसंवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नसून मानव, प्राणी, पक्षी यांसह सजीवांसाठी सुरक्षित आश्रयस्थान निर्माण करणे आहे. तरुणांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यास शाश्वत समाज निर्माण होऊ शकते, असे मत भारतीय वन सेवेचे उपवनसंरक्षक प्रभाकर प्रियदर्शी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय वनशहीद दिन-२०२६ चा भाग म्हणून बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसी, एनएसएस आणि रोव्हर्स अँड रेंजर्स युनिट्सद्वारे बेनाडीच्या गायरान वनक्षेत्रात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
पर्यावरण संरक्षण आणि जंगलांच्या महत्त्वाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एनसीसी कॅडेट्स, एनएसएस, स्वयंसेवक आणि रोव्हर्स अँड रेंजर्स युनिटमधील १४० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि ११११ हून अधिक रोपे लावली. याशिवायविद्यार्थ्यांना त्यांचे संवर्धन, जंगलांचे महत्त्व आणि पर्यावरणीय संतुलनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.विभागीय वन अधिकारी डी. शिवकुमार यांनी, वृक्षारोपणाचा उत्साह केवळ रोपे लावण्यापुरता मर्यादित राहू नये. लावलेली रोपे मोठी होऊन झाडे बनतील, तेव्हाच आपल्या प्रयत्नांना यश येईल, असे सांगितले. प्राचार्या डॉ. एम. एम. हुरळी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी केवळ वर्गातील धडेच नव्हे, तर त्यांचा समाज आणि निसर्गाशी असलेला थेट संबंधही महत्त्वाचा आहे. रोप लावण्याचा आणि त्याचे संरक्षण करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी, शिस्त, सेवाभाव आणि निसर्गाबद्दलची आस्था रुजवत असल्याचे सांगितले. लावलेल्या रोपांच्या वाढीची आणि संवर्धनाची जबाबदारीही घेण्यात आली.
याप्रसंगी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागा तर्फे सहभागी झालेल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.यावेळी पदवीपूर्वक महाविद्यालयाच्या प्राचार्या हेमा चिक्कमठ, आयक्यूएसी समन्वयक डॉ. ए. ए. कांबळे, डॉ. एस. एम.रायमाने, शंकरमूर्ती के.एन., एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट सिद्दू उदगट्टी, एनएसएस. कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. वाय. केंचक्कनवर, डॉ. एस.आर. हुन्नरगी, रोव्हर्स आणि रेंजर्सचे प्रमुख डॉ. एम. डी. गुरव, डॉ. बी. एम. जनागौडा आणि डॉ. एस. एस. कुंभार, एस. पी. पाटील, डॉ.अशोक राठोड, तेजस्विनी नंदी, काव्यश्री कुम्मुर, महेश केंचागौड आणि महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta