विद्यार्थी व कामगारांचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा खानापूर : गर्लगुंजी येथील श्री माऊली देवी यात्रा काळात तसेच यात्रेनंतरही बेळगाव–गर्लगुंजी आणि खानापूर–गर्लगुंजी या मार्गांवरील बसफेऱ्या वाढवाव्यात व सुरू असलेल्या बससेवा सुरळीत ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर बेळगाव–गर्लगुंजी व खानापूर–गर्लगुंजी मार्गांवर बससेवेमध्ये अनियमितता निर्माण …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी राजा शिव छत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक 11 वाजता बोलवण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश केसरकर यांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …
Read More »गणेश मंडळ देसाईवाडा (तिओली) ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान
खानापूर : शुक्रवार दिनांक 24 रोजी तिओली (देसाई वाडा) येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गणेश मंडळ देसाईवाडा आणि ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सरचिटणीस …
Read More »पावसापूर्वीच तालुक्यातील सर्व विद्युत दुरुस्ती कामे पूर्ण करा; यात्रा काळात वीज सुरळीत द्या
खानापूर : ऐन पावसाळ्यात बऱ्याच वेळा वीज दुरुस्ती कामासाठी काढली जाते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी विद्युत ताराना लागणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि इतर अडचणी च्या ठिकाणचे पार्ट बदलने ही सर्व कामे आताच आवरून घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यात लोकांना अंधारात राहण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही तसेच गर्लगुंजी …
Read More »गाऊन घालण्याच्या वादातून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न: पतीला अटक
खानापूर : गाऊन घालण्यावरून झालेल्या वादातून पत्नीला पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नंदगड पोलिसांनी अटक केली आहे. खानापूर तालुक्यातील करजगी गावच्या रहिवासी श्रीमती संतोषी नारायण भातखांडे (55) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 19 एप्रिल रोजी रात्री बेळगावच्या बिम्स रुग्णालयात जाऊन तक्रार दिली, त्यानंतर नंदगड पोलीस …
Read More »श्री नागेश महारुद्र मंदिर कळस शोभायात्रा भक्तिमय वातावरणात
खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्री नागेश महारुद्र मंदिराच्या कळसाची भव्य शोभायात्रा सोमवार, दि. २० एप्रिल रोजी मोठ्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. परिसरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कळस व देवमूर्तींचे दर्शन घेतले. देसाई गल्लीतील निरंजन सरदेसाई यांच्या …
Read More »निवृत्तीनंतरही किरण देसाई यांनी समाजासाठी योगदान देणे आवश्यक : निवृत्त शिक्षक वसंत देसाई
खानापूर : तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतरही किरण देसाई यांनी सामाजिक कार्यासाठी वेळ देत सक्रिय राहून समाजाला मार्गदर्शन करावे, असे मत निवृत्त शिक्षक वसंत देसाई यांनी व्यक्त केले. हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण देसाई यांच्या निवृत्ती निमित्त हलशीवाडी येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत …
Read More »खानापूर तालुक्यातील कुंभार समाजातील ज्येष्ठ नागरिक सन्मानित : संत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी
खानापूर : खानापूर तालुका पातळीवर कार्यरत असलेले दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळकडून रविवार (दि. 19) रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संत गोरा कुंभार पुण्यतिथी शिवस्मारक येथे दुपारी ३ वाजता करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित साधून कुंभार समाजातील चाळीसहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बेकवाडच्या कलमेश्वर मंदिरात शिवलिंगावर अर्ध नटेश्वर सूर्यकिरणांचे दर्शन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील बेकवाड (ता. खानापूर) येथील प्राचीन कलमेश्वर मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एक अद्भुत आणि मनोहर दृश्य पाहावयास मिळाले. पहाटे उगवत्या सूर्याच्या किरणांनी मंदिरातील शिवलिंगावर ‘अर्ध नटेश्वर’ स्वरूपातील प्रकाशरेषा उमटल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी साधारणपणे 6.45 ते 7.05 या वेळेत हे सूर्यकिरण …
Read More »श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी
खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत असलेल्या श्री नागेश महारुद्र मंदिराच्या जीर्णोद्धाराशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी मंदिर परिसरात पार पडली. या बैठकीत मंदिराचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने कळस, नंदी, गणेश मूर्ती इत्यादींची विधीपूर्वक स्थापना करून पुढील काळात प्राणप्रतिष्ठापना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta