
खानापूर प्रतिनिधी : खानापूर–लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ मंगळवारी रात्री दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन भारतीय सैनिक युवराज शत्रुघ्न माळिक (३०) यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी मोहिनी युवराज माळिक (२५, रा. जटगे) यांचा उपचारासाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.
दोघेही खानापूरहून जटगे गावाकडे दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले असून, या प्रकरणाची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जटगे गावावर शोककळा पसरली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta