Sunday , September 20 2026
Breaking News

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

Spread the love

 

बेळगाव, बंगळूरसह १५ ठिकाणी कारवाई

बेळगाव : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना बुधवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धक्का दिला असून, त्यांच्या निवासस्थानांसह कार्यालय आणि कर्नाटक, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांसह बेळगाव, बंगळूर आणि महाराष्ट्रातील एकूण १५ ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सतीश जारकीहोळी यांचे नातेवाईक तसेच अधिकारी मंजुनाथ यांच्याशी संबंधित कथित अबकारी गैरव्यवहार प्रकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनधिकृतपणे बार परवाने मंजूर केल्याच्या आरोपासह कथित बेकायदेशीर परकीय निधी गुंतवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून तपास आणि झडती सुरू आहे.

या कारवाईमुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ईडीच्या तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *