Saturday , June 6 2026
Breaking News

अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळ निश्चित!

Spread the love

 

बेळगाव : सततच्या पावसामुळे सर्वत्र डोंगर कोसळण्याच्या घटना घडत असून बेळगाव जांबोटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

खानापूर तालुक्यातील जांबोटी ते बेळगाव शहराला जोडणाऱ्या जांबोटी-पिरनवाडी रस्त्यावर (राष्ट्रीय महामार्ग 54) अवजड वाहनांना बंदी आणि खानापूर ते जांबोटी (राज्य महामार्ग 31) यांना जोडणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळा जारी करण्यात आल्या आहेत. खानापूरहून जांबोटीकडे जाण्यासाठी सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत एकेरी प्रवास करतील आणि जांबोटीहून ते खानापूरकडे जाण्यासाठी दुपारी १ ते रात्री ८ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *