Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

अरिहंत क्रेडिट सोसायटीतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

  निपाणी (प्रतिनिधी) : बोरगाव येथील श्री अरिहंत को -ऑप. क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट संस्थेतर्फे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सहकार रत्न रावसाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक अभिनंदन पाटील व अरिहंत विविधोद्देशीय संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील उपस्थित होते. …

Read More »

‘नेसा’तर्फे निपाणीत १७ डिसेंबरला मॅरेथॉन स्पर्धा

  नोंदणी उद्घाटन सोहळा; यशस्वी खेळाडूंचा सत्कार निपाणी (वार्ता) : निपाणी एंडोरन्स स्पोर्ट्स असोसिएशन (टीम नेसा) यांच्यामार्फत मॅरेथॉनमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूचा सत्कार करण्यात आला. येथील संगम पॅराडाईज हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कोडीचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर …

Read More »

अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

  पी. पी. कांबळे; भारत यात्रा जागृती सभा निपाणी (वार्ता) : स्थानिक स्वराज्य संस्थांसह सरकारी प्राथमिक शाळांत शासनाने कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या कामावर ताण पडत आहे. याशिवाय शाळे व्यतिरिक्त अनेक कामे त्यांना लावली जात आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची मागणी अनेक वर्षापासून असूनही त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी …

Read More »

ऊन पावसाच्या खेळात बाप्पांचे निपाणीत जल्लोषी स्वागत!

  सायंकाळी सार्वजनिक मंडळाची मूर्ती प्रतिष्ठापना; पारंपारिक वाद्यांचा गजर निपाणी (वार्ता) : ऊन पावसाचा खेळ, भाविकांचा उत्साह, फटाक्यांची आतषबाजी आशा वातावरणात मंगळवारी (ता.१९) सकाळी घरगुती आणि सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जल्लोषात करण्यात आले. यावर्षीही डॉल्बीला व डीजेला बंदी असल्याने स्वागत मिरवणूक पारंपारिक वाद्याच्या गजरात पार पडली. सकाळी ९ …

Read More »

प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरा

  अभियंते गजानन वसेदार : निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बांधकाम व्यवसायाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले असून व्यवसाय स्पर्धात्मक बनला आहे. याशिवाय ग्राहकांच्या अपेक्षाही वाढत चालले आहेत. या अपेक्षा समजावून घेऊन काम करण्याची जबाबदारी प्रत्येक अभियंत्यावर आली आहे. त्यानुसार प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून …

Read More »

अरिहंत दूध उत्पादक संघाला ३.९४ लाखाचा नफा

  उत्तम पाटील; ४८वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावत असले तरी ग्रामीण भागात अलीकडच्या काळात गाय, म्हैस पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दूध उत्पादनात घट होत चालली आहे. अशा परिस्थितीत अरिहंत दूध उत्पादक संघाने चांगल्या प्रकारे दूध संकलन करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक सुविधा …

Read More »

जी. आय. बागेवाडी महाविद्यालयामध्ये जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार चिक्कोडी पदवीपूर्वशिक्षण विभाग आणि केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जलतरण, टेबल टेनिस, फ्लोरबॉल, आणि बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कोडी जिल्हा क्रीडा समन्वयक अजय मोने आणि निपाणी तालुका क्रीडा समन्वयक जिनदत्त पाटील यांची उपस्थिती होती. स्पर्धेत केएलई …

Read More »

नेपियर गवतापासून पहिला बायो- सीएनजी प्लांट

  एसडीआर फाउंडेशनचा उपक्रम; जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर निपाणी (वार्ता) : एसडीआर फाउंडेशनने केआयएसच्या सहकार्याने बायो सीएनजीमधील जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून नेपियर गवता पासून पहिला बायो- सीएनजी प्लांटचा प्रारंभ केला आहे. हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे उभारण्यात येणार आहे. एसडीएस फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा अनिल इंग्रोळे आणि केआयएस संचालक …

Read More »

ममदापूर येथील अंबिका मंदिरात बुधवारपासून किरणोत्सव

  निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल.) येथील प्रति तुळजापूर म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पूर्वाभिमुख अंबिका मंदिरात सूर्योदयापासून वीस मिनिटांपर्यंत किरणोत्सव होत आहे. हा सोहळा वर्षातून दोन वेळा भाविक अनुभवत आहेत. बुधवार (ता.२०) ते शुक्रवार (ता.२२) या तीन दिवसांत हा किरणोत्सव स्पष्टपणे दिसणार आहे. यातील गुरुवारी मुख्य दिवस आहे. या किरणोत्सव …

Read More »

यंदाचा गणेशोत्सव फटाके मुक्त करणार

  ‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ : पर्यावरण जपण्याचा दिला संदेश निपाणी (वार्ता) : विविध प्रकारच्या निवडी, दिवाळी, निवडणुका, वाढदिवस, यात्रा, जत्रा, गणेशोत्सवासह अनेक सण समारंभाच्या वेळी फटाक्यांची आतशबाजी केली जाते. त्यामुळे हवेचे प्रदूषण होण्यासह पर्यावरणाची हानी होत आहे. शिवाय कुटुंबप्रमुखांना आर्थिक भार सोसावा लागतो. ही बाब गांभीर्याने घेऊन जळगाव मराठा …

Read More »