Monday , May 25 2026
Breaking News

निपाणी

स्मशान मारुती, शनि मंदिरात दीपोत्सव उत्साहात

  निपाणी (वार्ता) : येथील स्मशान मारुती आणि आदर्श नगरातील शनि मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव पार पडला. स्मशान मारुती मंदिरात श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समई पूजन करून कार्तिक दीपोत्सव सुरू झाला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. भक्तांनी मंदिर परिसरामधील ठेवलेल्या पणत्या लावून मंदिर परिसर उजळून टाकला. यावेळी भक्तांना …

Read More »

अतिथी शिक्षक भ्रष्टाचाराची चौकशी होणार : डॉ. राजेश बनवन्ना

  निपाणी (वार्ता) : येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचाराचे प्रकार घडत आहेत. आपण अतिथी शिक्षक असून लाच न दिल्याने थकीत वेतन अदा न करता तबस्सुम गणेशवाडी यांना कामावरून कमी करण्यात आल्याची तक्रार अतिथी शिक्षक असलेल्या जावेद गणेशवाडी आणि तबस्सुम गणेशवाडी दाम्पत्यांने केली. तरीही कोणतीच कारवाई होत नसून याप्रश्नी आप पार्टीच्या …

Read More »

कुन्नूर दूधगंगा पीकेपीएसवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व

  निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील दूधगंगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची (पीके पीएस) निवडणूक रविवारी (ता.१०) चुरशीने झाली. त्यामध्ये बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील गट पुरस्कृत पॅनलने भरघोस विजय मिळवित स्थापनेपासून भाजप गटाकडे असणाऱ्या संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार निबंधक खात्याचे अमित शिंदे यांनी काम …

Read More »

तब्बल २६ वर्षानंतर ‘देवचंद’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २६ वर्षानंतर दोन दिवसांचा स्नेहमेळावा दांडेली येथे पार पडला. यावेळी आजी माजी प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी प्राचार्य डॉ. एम. जे. कशाळीकर यांनी, प्रत्येकांनी महाविद्यालयीन काळातील शिस्त जीवनातही पाळली पाहिजे. समाज, शाळा …

Read More »

अक्कोळच्या सव्वा दोन वर्षाच्या प्रीतम दळवीची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील सव्वा दोन वर्षे वय असलेल्या प्रीतम दळवी या चिमुकल्याचे आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने (इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये) नोंद झाल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. प्रीतम हा अकरा महिन्याचा असतानाच एखाद्या वस्तूचे निरीक्षण केल्यास किंवा ऐकल्यास पुरेसे आहे. या सर्व गोष्टी केव्हाही विचारल्यास पटापट त्यांची माहिती …

Read More »

फसवणुकीच्या घटनापासून दूर रहा

  वसंतराव मुळीक; निपाणीत वधू-वर पालक महामेळावा निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात वधू-वरांचे लग्न जमवणे ही सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. आत्याला प्रशिक्षणामुळे मराठा समाजातील युवकांची गोची होत आहे. त्यामुळे समाजातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे. सध्या वधू-वर नोंदणीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक सुरू झाली आहे. त्यापासून दूर राहून प्रत्येकाने सुसंवाद राखला …

Read More »

‘सांजड’ कथासंग्रहाला शिवार प्रतिष्ठानचा ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ घोषित

  निपाणी (वार्ता) : प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी कृषक संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यकृतीला मागील एकवीस वर्षांपासून ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी २२ वा पुरस्कार निपाणीच्या कन्या आणि सध्या कोल्हापूर येथील रहिवासी सुचिता घोरपडे यांच्या ‘सांजड’ या कथासंग्रहास घोषीत करण्यात आला आहे. …

Read More »

निपाणी सटवाई मंदिरात दिपोत्सव

  निपाणी (वार्ता) : येथील सटवाई रोडवरील सटवाई मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. श्रीमंत दादाराजे देसाई -निपाणकर सरकार यांच्या हस्ते देवीसह समईचे पूजन करून दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर भक्तांनी मंदिर परिसरामध्ये असलेल्या पणत्या लावून सटवाई मंदिर परिसर उजळून टाकला. यावेळी दादाराजे देसाई यांचा अजित जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला. महाआरती झाल्यानंतर …

Read More »

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळतर्फे दीपोत्सव

  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ,शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर शिवाजी चौकातील नागरिकातर्फे परिसरात दिवे लावण्यात आले. उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्य शासनाकडून सहकाररत्न पुरस्कार …

Read More »

लोकअदालतीत तब्बल ६ जोडपी रेशीम गाठीत

  नव्याने थाटला पुनर्संसार; निपाणीत अनेक प्रकरणे निकाली निपाणी (वार्ता) : निपाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत समुपदेशन केल्यानंतर चार घटस्फोटीत तर घरगुती भांडणातून विभक्त झालेल्या दोन अशा सहा जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पूर्तता करून या जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला. यामध्ये …

Read More »